Saturday, February 26, 2011

ज्याले नसते चव ..... त्याले म्हनतेत 'लव'

हवा बी 'लव' आहे
पाणी बी 'लव 'आहे

तो येणारा सूर्यप्रकाश
ते बी 'लव' आहे

हा वाहणारा वारा
हे बी  'लव' आहे

कोणी त्याचात आले
कि त्याचे होवून जाते

त्याले आपण कोण
हे दाखवाव लागत नाही
तरी ते आहे 

जर ते नसेल
तर मात्र काही काही नाही

म्हणूनच म्हंतो

ज्याले नसते चव ..... त्याले म्हनतेत 'लव'

Saturday, January 22, 2011

या वळणावर ...... त्या वळणावर

dated 22/01/2011

या वळणावर ...... त्या वळणावर
कधी आरंभी  ......तर कधी सरणावर

कधी घेई भरारी आकाशवेधी
कधी अपघाते काळीज छेदी

कधी सौदर्य आणि सबलता
किती कुरूप निर्मम दुर्बलता

कधी निरागस मनास मोही
कधी नजर झुके,नृशंस दिसता काही

कधी निषेध होता सार्थक वाटे
कधी विरोध होता फुटती फाटे
कधी किती निरर्थक संघर्ष येथे  

एक येते.... एक जाते
कधी प्रसंगे...... वेळ मारून नेते

फक्त कुणी

या वळणावर ...... त्या वळणावर
कधी आरंभी  ......तर कधी सरणावर
 
- प्रणवयंत्र

क्षण आहे महत्वाचा

 dated 22/01/2011

वाट संपलेली आहे , वाट संपणार आहे
आज इथवर आलो , उद्या आणि कुठे आहे

कधी कधी कशासाठी जीव वेडावला होता
कधी कधी कशासाठी जीव कष्टला होता

जी वेडं वेडावून गेली , का ते भ्रांत आहे ?
कधी कातावून जाता , त्या वेडा वेंगाडूनी पाहे

वेग वायूचा कल्पिता , वेग येतो तो मुंगीचा
मन अश्रांत होते , खेळ वाटे तो पुंगीचा* (*गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली )

कारे अश्राप जीवाची अशी करतो परीक्षा ?
काही नाही मागितले न कोणती अपेक्षा ?

वाट संपलेली नाही ... वाट संपणार नाही
कुठे थांबलो हि नाही ...कि थांबणार नाही

क्षण आहे महत्वाचा ..तो वाया जाता नये
काही राहील जे  मागे .... ते सर्व फुके आहे

- प्रणवयंत्र



Saturday, December 4, 2010

वाट चुकलेला मुसाफिर

dated 19/04/02

वाट चुकलेला मुसाफिर मी
               वाट नवीन शोधतो
पुन्हा नव्या वळणावर
              परत एकदा चुकतो
चालत राहतो थोडा काळ
             काही वेळ थांबतो
योग्य वाट शोधण्यासाठी
             पुन्हा मागे फिरतो

--  प्रणवयंत्र

Saturday, October 23, 2010

Aye Aye........ it is simple

Guys wanna write poem in english.... Believe me it is simple.
It can be 4 liner or may be 8 .......But believe me it is simple

How ?       Listen ....

1st dont look at meaning 
Just put onto paper
that comes to your mind ...whatever

like ....

Mom says it is simple
Pop says it is simple
My friend Tom says it is simple
Aye Aye it is simple
Oh yeah ... it is simple

one friend ....Well , will you give one example ?
Oh sure ....just read the above sample...
Aye Aye it is simple
Oh yeah ... it is simple

Wednesday, September 29, 2010

बूँद से..

 dated ::: 29/10/2010

नाकारा है यें दुनिया
कूच समज में ही नहीं आती

कुछ करो न करो
चाहे खामोश रहो
बातें बिघडती ही जाती

दोस्त समजा करो ,
बूँद से जाती हें जो
वो हौद से नहीं आती

--- pranavyantra

Saturday, September 18, 2010

Praising This World

  date 18/09/2010


One day my mind ask to me,
  What is beautiful ?

  My conscious replied,

  Let your brain think about it
  Let it come through your Heart

  Let your eyes break the barriers
  and shed the tears apart  

  when your senses feel it sweet
  when your tongue start to tweet

  when you think your dream is big enough
  and accomplishing the same is task tiresome

  when you die for a reason
  when you cry without reason
  when you pray all the season
 
  when you became happy and all the things that make you happy
  so many and many more


  Yes this world is beautiful ....

  Oh lord, dont stop me praising this world.

-- pranavyantra

Thursday, August 19, 2010

लबाडांच्या राज्यात

लबाडांच्या राज्यात     dated:19/08/2010 10.45PM

लबाडांच्या राज्यातले
लांडगे सुद्धा शेळी असतात

एकमेकामधील जीवाभावाचे मैत्र .....
ह्या मैत्रीपूर्ण खेळी असतात

मतपेटीनुसार
नंबर १.............. राजा
नंबर 2..............वजीर
बाकीसर्व...........'हाजीर' असतात

कालचे असणारे कर्दनकाळसुद्धा 
आता godfather(संत सज्जन) बनतात

अहो ...
१०० उंदीर खावून इथे मांजरे हाजला जातात

जीवासारख्या जीवास सुद्धा
रोज पाण्यात पाहतात

गेला एकदा जीव ......
कि  मात्र अश्रू पाण्यासारखे वाहतात

लबाडांच्या राज्यात
फक्त लांडगेच शेळी बनतात 


-pranavyantra

Sunday, August 1, 2010

माणुसकी( चारोळी)

माणुसकी ती, 
जी माणसाला माणसाशी जोडते

पुढची दहा घर जळू नयेत
       म्हणून
आपलं घर आनंदाने जाळते

--प्रणवयंत्र

Thursday, July 29, 2010

Spirituality

What is spirituality ....

Is it a Art of living ..?
Is it a Part of living..?

Sometimes it is art
Sometimes it is part

some times it is subject to new start
some use it as to move apart(from this world)
many a times it is very close to one's heart

Some see it as a day to day routine
some use it for self soothing

wonder , time has changed so are the means
but still it is same for all its kins







--pranavyantr

Wednesday, April 21, 2010

Inspiration

 Inspiration
- dated 21-04-2010

Anyone can borrow money
Anyone can borrow a thought

Anyone will get a leader
to lead a battle to be fought

Anyone will learn a technique
or may invent

Anyone will manage anything
or will do a lot

But will like to salute
The Inspiration Burning deep in a Heart

- pranavyantra

Friday, April 2, 2010

विश्वास आज...................... अविश्वास उद्या dated 04/03/2010

विश्वास आज...................... अविश्वास उद्या
आयत मिळाल तर ठीक .....नाहीतर जावूद्या

कोणास पडले आहे ........काही हि होवूद्या
रोजच कटतात ती ..... अहो जंगलाच साफ वळवंत होवूद्या

आत्ता फक्त २० टक्केच संपल्या आहेत ...... हिमनद्या
पूर्णाच्या पूर्ण ....... कि हो आटूद्या

काही बिघडत नाही जरी वाढली लोकसंख्या तरी
आमचीच आहे धरती ...... बाकी सगळी जनावरे ......मेली तर मरुद्या

जागे व्हा ...... आत्ता वेळ आहे ......
हा वाटणारा विश्वास आज पुरताच आहे ,,,,,,

झाडे लावा झाडे ....... महिन्याला एक ....
संगोपन करा त्यांचे ...घेवून मेहनत नेक

--- प्रणवयंत्र

चालत असतो दिसतो मोका -- dated 29/03/2010

चालत असतो ..... दिसतो मोका

मन आनंदून जाते ...... गिरकी घेते
............................. घेते हवेत झोका

मध्ये ठेच लागते ... उघतात डोळे
..............चुकतो हृदयाचा ठोका

मन विषणणं होते... झुर झुर झुरते
कधी सलतो झालेला तो धोखा

पण , थांबत नाही मेहनत घेतो
वाट संपते रस्ता बनतो
बघता बघता हमरस्ता होतो

चालत जातो चालत जातो
थांबत नाही मेहनत घेतो
वाट संपते रस्ता बनतो
बघता बघता हमरस्ता होतो


--- प्रणवयंत्र

Friday, March 26, 2010

सगळ्यात आहे कशात नाय

सगळ्यात आहे कशात नाय
dated 20/03/2010
सगळ्यात आहे कशात नाय ....... तरीही आमचा फाटक्यातच पाय
................... दिसलं जरी तरी दिसत नाय
.................... कळला तरी वळत नाय
.................... हुंगवल तरी चळत नाय
.................... पेटवलं तरी पेटत नाय
.................... निघाले टाके तरी उसवत नाय
कशात काय फाटक्यात पाय

दारिद्र्य आहे पण गरिबी नाही
सौदर्य आहे पण गरिमा नाही
शालीन आहे पण लाचारीहि
शौर्य आहे पण कठोर नाही
ज्ञान आहे पण प्रवाही नाही
विकास आहे पण विचार नाही
लोकशाही आहे पण लोकांसाठी नाही

सगळ्यात आहे कशात नाय ....... तरीही आमचा फाटक्यातच पाय

......... .... प्रणवयंत्र

मुक्त मी - विमुक्त मी

::::::: मुक्त मी - विमुक्त मी ::::::
dated 20/03/2010

मुक्त मी विमुक्त मी
ज्ञानप्रिय भुक्त मी
शक्तीप्रिय शाक्त मी
शाश्वत सुंदर सत्य मी
शांत मी अशांत मी
विहंग विराट प्रशांत मी
न वस्तू सापेक्ष मी
न वस्तू विशेष मी
न जोश आवेश मी
न मद मतसर द्वेष मी
न निंदा दोष क्लेश मी
न जात धर्म वेश मी
न राज्य सीमा देश मी
न कायदा न आदेश मी
न आरंभ अस्त प्रवेश मी
न पूर्ण अपूर्ण लेश मी
मुक्त मी विमुक्त मी
ज्ञानप्रिय भुक्त मी

................. प्रणवयंत्र